२० जानेवारी पथविक्रेता दिन म्हणून साजरा करावा याआणि पथविक्रेत्यांना कोरोना योद्धा घोषित करावे या साठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
पथविक्रेते राज्याच्या आणि देशाच्या औनपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाच्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात .राज्यातील सामान्य जनतेला स्वस्त दरात आणि दारात वस्तू आणि सेवांची उपलब्धता करून ते महत्वपूर्ण भूमिका बजवतात,हे पथविक्रेते फेरीवाले,हौकर्स,ठेलावाले, रिहारिवाला इत्यादी म्हणून विविध क्षेत्रात ओळखले जातात.ते पुरवीत असलेल्या वस्तूंमध्ये गृहपयोगी व जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे त्याचप्रमाणे त्यांच्या सेवांमध्ये नाभिक,पानवाले, परीट या सेवा देखील समाविष्ट आहेत.
सामान्य जनतेला कुटुंबाच्या उधारनिर्वाह साठी व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वरील सेवा व वस्तूंची आवश्यकता भासत असते,पथविक्रेत्यांना जशी आपली गरज आहे तशीच राज्यातील जनतेला देखील पथविक्रेत्यांची गरज आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात देखील या पथविक्रेत्यांनी आपल्या सेवा अखंडित चालू ठेवल्या.समाजातील हा असंघटित घटक नेहमीच दुर्लक्षित असल्या कारणाने त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.म्हणूनच ज्या दिवशी पथविक्रेत्यांसाठी आपल्या देशात स्वतंत्र कायदेशीर धोरण लागू झाले तो दिवस म्हणजे २० जानेवारी २००४ हा दिवस ( २० जानेवारी) 'पथविक्रेता दिन' म्हणून घोषित करावा.तसेच कोरोना काळामध्ये आपली सेवा अखंडित चालू ठेवणाऱ्या पथविक्रेत्यांना कोरोना योध्दा म्हणून घोषित करावे असे निवेदन साई एकता हॊकर्स युनियन तर्फे मा.अप्पर जिल्हाधिकारी,मालेगाव यांना देण्यात आले या प्रसंगी युनियन चे अध्यक्ष सुधाकर जोशी ,सरचिटणीस दिनेश ठाकरे,असिफ तांबोळी,राजेंद्र पाटील,मनोज बोरवाल, विकी पाटील,शाम करपे,राजेंद्र ललन,रवींद्र देवरे,सूर्यकांत बनसोडे,राहुल उपाडे,मंगेश बावसकर,मयूर परदेशी,कलंदर शेख,सैफु रहमान आदी उपस्थित होते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق