शिक्षक भरतीला विशेष परवानगी देणार. अजितदादा पवार



राज्यात कोरोना च्या प्रादुर्भावामुळे रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळावी यासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे वतीने राज्यात डी.एड बी एड उमेदवारांचे वतीने राहत्या घरून १ जूलै २०२० पासून धरणे आंदोलन तसेच बेरोजगार दिवसानिमित्त बेरोजगार दिवस आंदोलन, पोस्ट कार्ड आंदोलन, आणि टेक्स्ट मेसेज आंदोलन सुध्दा केली होते आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक तथा राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी वारंवार पाठपुरावा करून प्रयत्न केले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सोबत झालेल्या चर्चेत शिक्षक भरतीला विशेष परवानगी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत, आणि राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड मॅडम यांनी देखील याबाबत निर्णय घेण्याबाबत उपमुख्यमंत्री यांना विनंती केली आहे म्हणून मागील सहा महिन्यांपासून शिक्षक भरतीला घातलेलं निर्बंध लवकरच उठणार आहेत.०२आकटोबर गांधी जयंतीच्या दिवशी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

ليست هناك تعليقات: