शहीद हाजी कलीम शाह यांच्या स्मरणार्थ धुळे शहरात साथीचे रोग नियंत्रित करण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे साईनाथ क्लिनिक येथे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते उद्घाटन.
मलेरिया, डेंगू, टायफॉईड, वायरल इन्फेक्शन या सारख्या साथीचे आजारांवर मोफत उपचार करण्यासाठी आमदार फारूक शाह यांचा स्तुत्य उपक्रम.
धुळे शहरात अस्वच्छते मुळे व खराब पाण्यामुळे वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगाची साथ चालू आहे. धुळे शहरातील नागरिकांना मलेरिया, डेंगू, टायफॉईड, वायरल इन्फेक्शन या सारखे आजाराने गरीब नागरिक त्रस्त झालेले आहे. या संदर्भात धुळे शहर आमदार फारूक शाह यांनी या विषयावर आमदार कार्यलयावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तातडीची बैठक बोलवण्यात आलेली होती त्यात धुळे शहराच्या विविध भागात मोफत आरोग्य शिबिर ठेउन धुळे शहर नागरिकांना त्याचा मोफत लाभ मिळावा यासाठी धुळे शहराच्या १) एल. एम. सरदार हायस्कूल, देवपूर, धुळे २) साईनाथ क्लिनिक, १०० फुटी रोड, धुळे ३) मनपा शाळा क्रमांक ५१ व ५२, वडजाई रोड, धुळे ४) मनपा शाळा क्रमांक २५ मौलवीगंज, धुळे व ५) आमदार कार्यालय वडजाई रोड धुळे या भागात दि.०५ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट पावेतो अर्थात गुरुवार ते रविवार असे ४ दिवस व वरील ५ ठिकाणी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात धुळे जिल्हा रुग्णालयातील व धुळे महानगरपालिकेतील डॉक्टर तसेच त्यांचे अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवा देणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज १०० फुटी रोड येथे असलेल्या साईनाथ क्लिनिक येथील मोफत आरोग्य शिबिराचे आमदार फारूक शाह यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार फारूक शाह यांच्या समवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना फारूक हजरत, डॉ. मोहसीन खान, डॉ. दीपश्री नाईक, डॉ. बापूराव पवार, सौ. लिना निलेश काटे, डॉ. सदफ शेख, सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन शेख, शकिला आफा, जुनेद पठाण, रफिक शाह पठाण, सलमान खान, दिपाली पाटील, ज्योती चौधरी, प्रतीक्षा गवांदे आदी मान्यवर व प्रभागातील नागरिक व शिबिराचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन आमदार फारूक शाह यांचे स्वीय सहाय्यक तसेच जनसंपर्क अधिकारी असलेले श्री. निलेश काटे यांनी केले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق