साथी दत्ता वडगे विद्यार्थी पुस्तक पेढी, वाचन कट्टा लोकार्पण सोहळा संपन्न
मालेगाव- येथील जेष्ठ पत्रकार, माजी नगरसेवक, सेवा दल सैनिक दत्ता वडगे यांचे प्रथम स्मृति दिनानिमित्त साथी दत्ता वडगे विद्यार्थी पुस्तक पेढी वाचन कट्टाचे उद्घघाटन साधना वाचनालय संगमेश्वर, मालेगाव येथे आदिनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप कापडिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. बी. व्ही. मिस्तरी अध्यक्षस्थानी होते. साधना वाचनालय सचिव अशोक पठाडे, संचालक सुधाकर बागुल, राष्ट्र सेवा दल जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सुरवातीस दत्ता वडगे यांचे प्रतिमेस प्रदीप कापडिया यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. प्रास्तविकात नचिकेत कोळपकर यांनी इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शालेय पुस्तक उपलब्ध व्हावी त्या निमित्ताने त्यानी वाचनालयात येऊन इतरही पुस्तके वाचावीत व वाचन चळवळ दृढ व्हावी हा पुस्तक पेढीचा उद्देश सांगितला आणि व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करून दिली.
जेष्ठ पत्रकार नाना महाजन यांनी सांगितले की पुस्तक पेढी हीच खऱ्या अर्थाने दत्ता वडगे यांना आदरांजली आहे. नाशिक जिल्ह्यातील आदर्श असे पत्रकार दत्ता वडगे होते. त्यांची पत्रकारिता बघत आम्ही पत्रकार घडलो. राष्ट्रीय एकात्मता समितीच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम खूप मोठे आहे. सुभाष परदेशी यांनी सांगितले समाजवादी कसा असावा तर तो दत्ता वडगे यांच्या सारखा. आचार प्रचार कृती यातून दत्त वडगे यांनी आदर्श निर्माण केलेत. अशोक पठाडे यांनी उपस्थितांना या पुस्तकपेढीच्या कार्याला मदत करण्यासाठी आवाहन केले. प्रा. संताजी बाविस्कर, राष्ट्र सेवा दल जिल्हा संघटक रविराज सोनार, अॅड एम जी गीते, व्यंकटेश मारू आदींनी मनोगत व्यक्त करुन वडगे सरांबद्दलच्या आठवणी सांगितल्या.
वडगे सरांची कन्या सीमा तिडके हिच्या वतीने वडिलांच्या स्मृत्यर्थ २१,०००/- मदत विविध संस्थांना देण्यार असल्याचे विलास वडगे यांनी सांगितले. साधना वाचनालय, उर्दू पत्रकार संघ, राष्ट्र सेवा दल, संगमेश्वर मशिद येथे या रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी प्रदीप कापडिया यांनी संगमेश्वर म्हणजे समाजवादाचा बालेकिल्ला असून अनेक समाजवादी साथी इथे घडले, आम्ही देखील राजकारण व समाजकारण याचे बाळकडू इथूनच घेतले. पुस्तक पेढीसाठी शुभेच्छा ही दिल्यात.
या प्रसंगी प्रदीप कापडिया यांनी ११,०००/- व व्यंकटेश मारू यांनी ३०००/- पुस्तक पेढीला देणगी दिली.
स्वाती वाणी यांनी सुत्रसंचलन केले. पुस्तक पेढी समितीचे अध्यक्ष राजीव वडगे यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पना पाटील, योगेश देशावरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी राष्ट्र सेवा दल तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंके, रहिम शेख, प्रवीण वाणी, सुरेंद्र टिपरे, अॅड मनोज चव्हाण, बळवंत अहिरे, अनिल महाजन आदींसह सेवा दल सैनिक उपस्थित होते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق