अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना*
हयातीचे दाखले सादर करण्यासाठी मुदत वाढ
*: तहसिलदार चंद्रजित राजपूत*
*मालेगाव, दि. 16 (उमाका वृत्तसेवा)*: तहसिल कार्यालय, मालेगाव ग्रामिण कार्यक्षेत्रातील विशेष सहाय योजनेतील लाभार्थी यांना हयातीचे दाखले सादर करण्यासाठी मार्च 2021 पर्यंत मुदत शासन तरतुदीच्या अनुषंगाने देण्यात आली होती. आता दिनांक 3 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी वाढविण्यात आला असून हयातीचे दाखले व उत्पन्नाचे दाखले ज्या लाभार्थ्यांनी सादर केले नाहीत त्यांना 30 जून, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे तहसिलदार चंद्रजित राजपूत यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
संजय गाधी, श्रावणबाळ, वृध्दापकाळ, अपंग व विधवा या योजनेच्या लाभार्थ्यांनी यापूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर केले असल्यास अशा लाभार्थ्यांनी पुन्हा हयातीचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, तर ज्यांनी अजून हयातीचे दाखल्यासह उत्पन्नाचे दाखले सादर केले नाहीत त्यांनी संबंधित गावच्या तलाठीकडे विहीत मुदतीत सादर करावेत. मुदतवाढ दिलेल्या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे माहे जुलै 2021 पासून अर्थसहाय बंद करण्यात येईल यांची सर्व संबंधितांनी नोंद घेण्याचे अवाहनही तहसिलदार श्री. राजपूत यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*000000*

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق