अचानक आगीचा भडका झाल्याचे कळताच शिवसैनिकांनी घेतली धाव!
आज मोसमपुल येथील न्यायाधीश विश्रामगृह परिसरात झाडांचा पालापाचोळा भरपूर पडला असल्याने आगीने मोठा पेट घेतला.
अचानक आगीचा भडका झाल्याचे कळताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री.प्रमोदजी शुक्ला यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा आढावा घेऊन अग्निशमन दलाचे अधिकारी श्री.संजय पवार यांना सदर घटना दूरध्वनीद्वारे निदर्शनास आणून दिली व त्यांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली.
या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.प्रमोद शुक्ला, अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शिवसैनिक,युवासैनिक उपस्थित होते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق