मालेगाव महापालिकेत माजी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी



मालेगाव महापालिकेत माजी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी.
महाराष्ट्र  राज्याचे  दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती महापालिका  आयुक्तांच्या  सभागृहात साजरी करण्यात आली.  यावेळी मालेगाव महापालिका  उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस व उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास दोरकुलकर यांच्या हस्ते संयुक्तरीत्या  पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. 
 जयंती कार्यक्रमासाठी प्र. मुख्यलेखा परीक्षक राजू खैरणार, प्र.नगरसचिव श्याम बुरकुल, प्र.विधी विभाग प्रमुख बाळासाहेब धोंडगे, प्र.आस्थापना पर्यवेक्षक तौसिफ शेख, मो इरफान मो अशरफ, प्र.उद्यान अधीक्षक निलेश पाटील, प्र. संगणक विभाग प्रमुख सचिन महाले, केदा भामरे, साजिद अहमद मो हसन, बाजीराव सोळंकी, मिलिंद जगताप, भावसार, उदय आहिरे, गौरव पवार, श्याम अहिरराव आदी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  

ليست هناك تعليقات: