एकात्मिक आदिवासी विकास धुळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर...
आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना मोठे यश...
धुळे जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी काही तरी ठोस काम व्हावे आणि एकाच कार्यालयातून आदिवासी समाजाचा विकास व्हावा या संदर्भात एकलव्य आदिवासी विकास संघटना तसेच इतर संघटनाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात आदिवासी बांधवांनी आमदार फारूक शाह यांना निवेदन देवून आदिवासी विभागासाठी एकाच छताखाली कार्यालय व्हावे अशी मागणी गणेश धुळेकर, अजय मालचे, मच्छींन्द्र मोरे, मुलचंद महाराज, राहुल धुळेकर यांनी केली होती. वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी आज दि. १७-०३-२०२१ रोजी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार श्री. के. सी. पाडवी साहेब यांची भेट घेऊन त्यांना धुळे जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दयावा यासाठी मागील काही दिवसापासून प्रयत्न करत होते त्याला आज यश प्राप्त झाले असून एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी ४० लाख रुपये निधी प्राप्त झाले आहे. अशी माहिती आमदार फारुख शाह यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे. लवकरच या इमारतीचे बांधकामाचे काम सुरु होणार असून यामुळे आदिवासी बांधवांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں