उर्दु माध्यम उमेदवारांनवर अन्याय होऊ देणार नाही. शिक्षण मंत्री

शिक्षक भरतीला विशेष परवानगी साठी राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी घेतली  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले मागणीचे पत्र..

मुंबई: (विशेष प्रतिनिधी) राज्यात शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन दुसरी बुध्दिमत्ता चाचणीची दिनांक जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी माजी शिक्षण मंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजिया खान यांनी आज २१ आॅक्टोबर रोजी मंत्रालयात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम यांची भेट घेतली आणि मागणी चे निवेदन दिले उर्दु माध्यम उमेदवारांनवर अन्याय होऊ देणार नाहीं अशा आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या वेळी दिले.दिनांक १२ आॅक्टोबर रोजी रखडलेली शिक्षक भरतीला विशेष परवानगी आणि दुसरी बुध्दिमत्ता चाचणीची दिनांक जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे वतीने संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने  विद्यमान राज्यसभा खासदार श्रीमती फौजिया खान मॅडम यांची परभणी येथे भेट घेऊन चर्चा केली होती. मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात उल्लेख आहे की राज्यात पवित्र पोर्टल मार्फत २०१७ मध्ये शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि १२१४७ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यामधून फक्त ५८२२ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या सद्या राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे त्यासाठी वित्तीय उपयोजना करण्यासाठी वित्त विभागाकडून राज्यात पदभरती वर बंदी घालण्यात आली आहे परंतु राज्यात शिक्षक भरती १० वर्ष नंतर होत असून त्याला ०४ मे २०२० चे शासन निर्णयामधून वगळण्यात यावे आणि तात्काळ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी फौजिया खान मॅडम यांचे वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे करण्यात आली आहे. या वेळी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे वतीने राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी खासदार फौजिया खान यांच्या आभार मानले.

ليست هناك تعليقات: