आय.एच. एस.डी.पी. घरकुलांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मालेगाव महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर श्रीमती. ताहेरा रशीद शेख यांनी महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभाग प्रमुख, अधिकारी, पदाधिकारी यांची आज गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी महापौर दालनात बैठक घेतली.
सदर बैठकीचा प्रमुख मुद्दा महापालिके मार्फत तयार करण्यात आलेल्या आय.एच. एस.डी.पी. योजनेतील जवळपास पंधरा हजार घरकुले लाभार्थ्यांना वितरित करणेबाबतचा होता. योजनेतील बहुतांश सदनिका तयार असून योजनेसाठीच्या पात्र गरजू लोकांना वाटप झालेली नाहीत. उक्त योजेनेसाठी पात्र बरेचसे नागरिक अजूनही रस्त्यावर, शासकीय जागांवर अतिक्रमण व झोपडपट्टी करून राहतात. यावर मार्ग काढण्यासाठी महापौरांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार- महापौर तथा नगरसेवक रशीद शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, सहा.आयुक्त वैभव लोंढे, नगररचनाकार-२ संजय जाधव, शहर अभियंता कैलास बच्छाव, आय.एच. एस.डी.पी. योजने चे तथा पाणीपुरवठा अभियंता सचिन मालवाल, चारही प्रभागांचे प्रभाग अधिकारी - हरीश डिंबर, शाम बुरकुल, किशोर गिडगे, पंकज सोनवणे, उपअभियंता शांताराम चौरे, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, इत्यादी उपस्थित होते.
महापौर ताहेरा रशीद शेख व प्रशासन यांच्यात संपन्न झालेल्या बैठकीत खालील प्रमाणे चर्चा होऊन निर्णय झाले.
1. प्रभाग स्तरावर करण्यात येणारे आय.एच. एस.डी.पी. योजनेचे संपूर्ण कामकाज एकत्रित रित्या महापालिका मुख्यालय स्तरावर एकाच ठिकाणी करण्यात यावे.
2. जे गरीब लाभार्थी परिस्थिती अभावी योजनेच्या अंशदान ची रू.23,400/- रक्कम एकत्रित भरू शकत नाही. त्यांच्यासाठी सुलभा हप्त्यांचे नियोजन करण्यात यावे.
3. असे लाभार्थी प्रथमता 5000/- रूपये भरून उर्वरित रक्कम ठराविक मुदतीत दोन-तीन हप्त्यात पूर्ण भरू शकतील.
4. ज्या लाभार्थीना शक्य असेल ते पूर्ण रक्कम एकाचवेळी भरू शकतात.
5. ज्या लाभार्थींना सदनिका मिळाली आहे. त्यांना स्थलांतरित करून तेथील झोपडपट्टी निष्कासित करण्यासाठी अतिक्रमण विभागाने कारवाई करावी.
6. अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रशासनास पत्र देऊन त्त्वरीत संरक्षण घेण्यात यावे.
7. नागछाप व राहुल नगर येथे पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे आढळत आहे त्यामुळे महापौरांनी अतिक्रमण विभागावर नाराजी व्यक्त केली, व सदर अतिक्रमण त्वरित काढण्याचे निर्देश दिले.
8. लाभार्थीं पात्र आहे किंवा कसे याबाबत कोणते कागदपत्र, दस्तावेज व पुरावे बघावेत याबाबत प्रशासनाने फेरआढावा घ्यावा.
9. प्रमुख रस्ते व संबंधित अतिक्रमित झोपडपट्टी निष्कासित कराव्यात.
10. सर्वे नंबर 65,आयेशा नगर ,स्वीपर कॉलनी येथील मनपाची इमारत धोकादायक झाली असल्याने उक्त इमारतीचे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर इमारतीतील रहिवाशांना तात्पुरत्या काही कालावधीसाठी माळदे येथील आय.एच. एस.डी.पी. योजनेतील इमारतीमध्ये वास्तव्या करीता स्थलांतरित करणे शक्य आहे का? याची पडताळणी प्रशासनाने करावी. यावर माजी महापौर रशीद शेख यांनी दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी विशेष महासभेचे आयोजन करण्यात येईल असे जाहीर केले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق