मालेगाव महापालिकेकडून प्लास्टिक वापराबाबत दंडात्मक धडक कारवाई : आयुक्त कासार यांचे आदेश






.

मालेगाव मनपा: मालेगाव महापालिका आयुक्त त्रंबक कासार यांच्या आदेशान्वये आणि  उपायुक्त(मुख्यालय/विकास) यांचे मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण मालेगाव शहरात प्लॅस्टिक बंदी बाबत दंड वसुली ची कार्यवाही मनपा  स्वच्छता विभागा मार्फत करण्यात आली आहे  व या पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. स्वच्छता विभागाच्या स्वच्छता निरीक्षक यांनी  सहा.आयुक्त स्वच्छता अनिल पारखे व प्रमुख स्वच्छता निरीक्षक
उमेश सोनवणे यांच्या देखरेखीत प्लास्टिक वापराबाबत दंडात्मक कारवाई करून 55 हजार रुपये दंड वसुली केली तर 28 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.

वॉर्ड व प्रभाग निहाय कारवाई दृष्टिक्षेपात 

 1)वॉर्ड क्र 01 . स्व.नि. निशांत संसारे 5000 हजार प्लास्टिक दंड 
2)वॉर्ड क्र 08 वि.स्व.नि.संदीप कापडे 5000 हजार प्लास्टिक दंड
3)वॉर्ड क्र 09 वि.स्व.नि.संदीप कापडे 5000 हजार प्लास्टिक दंड 
4)वॉर्ड क्र 10 स्व.नि.कपिल परदेशी 5000 हजार प्लॅस्टिक दंड
5)वॉर्ड क्र 11 स्व.नि आकाश केदारे 5000 हजार प्लास्टिक दंड
6)वार्ड न.04 - 10000 दंड,स्व.नि श्याम सोनवणे 
7) वार्ड न.15 - 5000 दंड, स्व.नि विक्की देवरे एकूण गोळा केलेला प्लास्टिक :- 05 कीलो

प्रभाग क्र 01 मध्ये एकूण 25000 हजार दंड आणि एकूण 10 किलो प्लास्टिक जमा केले.
 
प्रभाग कार्यालय 02- 12 किलो प्लास्टिक जमा करण्यात आले आहे.
 
प्रभाग कार्यालय 03- 5 किलो प्लास्टिक जप्त व दंड वसुली 15000 रुपये.

 प्रभाग कार्यालय 04- 1 किलो प्लास्टिक जप्त व दंड वसुली15000 रुपये
 
 एकूण दंडात्मक वसुली 55000 रुपये.

तरी नागरिकांना, आस्थापना व  दुकानदारांना आवाहन करण्यात येते की प्लास्टिकचा वापर करू नये, प्लास्टिक वापर आढळल्यास मालेगाव महापालिकेकडून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. मालेगाव शहरातील सुज्ञ नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करा.



ليست هناك تعليقات: