आय टी आय प्रवेशाकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत 21 ऑगस्ट रोजी संपली परंतु शासनाकडून covid-19 ची परिस्थिती बघता प्रवेश अर्ज भरण्यास *31 ऑगस्ट 2020* पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. मालेगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत यावर्षी प्रवेशाकरिता *इलेक्ट्रिशियन, फिटर ,वेल्डर ,प्लंबर, कोपा व वायरमन* या ट्रेड करिता प्रवेश उपलब्ध आहेत.महिला व मुलींकरिता *ड्रेस मेकिंग* हा ट्रेड आहे. शासनाकडून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी *प्लंबर,वायरमन व ड्रेस मेकिंग* या ट्रेडमध्ये प्रत्येकी एक युनिट च्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांचा मागील वर्षी आयटीआयला प्रवेश झाला नव्हता त्यांनाही यावर्षी गुणांनुसार प्रवेश घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते. मालेगाव आयटीआय मध्ये *आय एम सी* कोट्याअंतर्गत प्रत्येक व्यवसायात *20 टक्के* जागा राखीव ठेवण्यात आल्या असून या जागांवर मालेगाव आयटीआय ने यावर्षी खास *कमी केलेल्या शुल्कामध्ये* प्रवेश उपलब्ध करून दिलेले आहे .याबाबतची सविस्तर माहिती तसेच आयटीआय प्रवेशाची बाबतची माहिती *व्हाट्सअप* माध्यमातून तात्काळ उपलब्ध करून दिली जाते *73 85 80 63 42* किंवा *98 22 13 50 22,* या मोबाईल क्रमांकावर प्रवेशाकरिता , प्रवेश माहिती करिता *ITI* व आय एम सी शुल्क माहिती साठी *IMC FEE* असा मेसेज टाईप करून पाठवल्यास सविस्तर माहिती ऑटो रिप्लाय द्वारे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येते. तरी परिसरातील सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता ऑनलाइन फॉर्म भरावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. बी.सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा केले आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق