भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकानागरिकांनी स्वच्छता ऐपचा वापर करावा - आयुक्त डॉ.पंकज आशिया

स्वच्छ सर्वेक्षण २०२१*  
मा. आयुक्त सो. यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने घेण्यात आली. सदर बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी पूर्वतयारी बाबत मा. आयुक्त सो. यांनी मार्गदर्शन केले.  शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या तक्रारी 'swachhata app'वर टाकण्याचे आवाहन केले असून सदर प्राप्त तक्रारी २४ तासाच्या आत निवारण करणे करिता सर्व आरोग्य अधिकारी यांना आदेश  दिले आहेत. ऑगस्ट महिन्यात मागील सप्ताहात  दरम्यान swachhata app वर एकूण ९५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ७३१ तक्रारी निवारण करण्यात आल्या आहेत, २२४ तक्रारी निवारण करण्याचे काम चालू आहे. लोकसहभागातून स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता ऍप (swachhata app) चा वापर करून या ऍपवर तक्रारी करण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले आहे.

ليست هناك تعليقات: