नागरिकांनी लाभ घ्यावा- कृषी मंत्री श्री भुसे व आयुक्त त्रंबक कासार
महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन
कृषी मंत्री महोदय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार शहरात कोरोणाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिका आयुक्तांमार्फत शहरातील विविध भागात नागरिकांची स्क्रीनिंग व आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे. प्रथम दिनांक 15 ऑगस्ट रोजीचे औचित्याने संगमेश्वर येथील वाल्मिक नगर शाळेत सकाळी 9:45 वा. महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले त्यावेळी उपायुक्त कापडणीस, नगरसेविका दीपिका वारुळे आरोग्याधिकारी सपना ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी,
डॉक्टर निमा सूर्यवंशी, मोहम्मद इरफान मोहम्मद आश्रफ, वैद्यकीय स्टाफ इत्यादी हजर होते.
संगमेश्वर, वाल्मिक नगर शाळेतील शिबिरात एकूण 52 जणांची तपासणी करण्यात आली तर त्यात 9 लोक संशयित आढळल्याने त्यांना स्वॅब देण्यासाठी संदर्भात करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण शहरांमध्ये दररोज विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा स्वतःचे आरोग्य सांभाळावे, सोशल डिस्टंसिंगचे,पालन करावे, मुखपट्टीचा वापर करावा असे प्रतिपादन महापौर ताहेरा रशीद शेख आणि उपायुक्त कापडणीस यांनी केले.
1) आज रविवार दिनांक 16 ऑगस्ट, रोजी सकाळी 9:45 वा. गणपती मंदिर शरद नगर कलेक्टर पट्टा, येथे शिबिरांची व्यवस्था केली आहे.
2) उद्या सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वाजता. सोयगाव नागरी आरोग्य केंद्राच्या बाजूला नवीन अग्निशमन केंद्र येथे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
*कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांचे व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन*
मालेगाव महापालिके च्या तपासणी शिबिरात नागरिकांची स्क्रीनिंग, शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण व आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषध गोळ्या देण्यात येतील तसेच आवश्यक संशयित रुग्णांना घशाचा स्त्रावाचा नमुना - स्वॅब देण्यासाठी पुढे संदर्भित केले जाईल. तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि आपले शहर आरोग्यमय करण्यास मदत करावी असे आवाहन ही मंत्री महोदय ना.श्री दादाजी भुसे व आयुक्त त्रंबक कासार यांनी केले आहे .
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں