जनसंपर्क विभाग मनपा मालेगाव.
दि.14/8/2020
प्रेसनोट
मालेगाव महानगरपालिका मार्फत प्रथम उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजीचे औचित्य साधून सकाळी 9:45 वाजेपासून संगमेश्वर येथील वाल्मिक नगर शाळेत मालेगाव महापालिके मार्फत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर गणपती मंदिर शरद नगर कलेक्टर पट्टा, येथे रविवार दिनांक 16 ऑगस्ट, रोजी सकाळी 9:45 वा. शिबिरांची व्यवस्था केली आहे.
उक्त शिबिरात नागरिकांची स्क्रीनिंग शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण व आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषध गोळ्या देण्यात येतील तसेच आवश्यक संशयित रुग्णांना घशाचा स्त्रावाचा नमुना - स्वॅब देण्यासाठी पुढे संदर्भित केले जाईल. सद्यस्थितीत खालील प्रमाणे तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
1) वाल्मिक नगर शाळा संगमेश्वर, शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2020, सकाळी 9:45 वा.
2) गणपती मंदिर शरद नगर कलेक्टर पट्टा, रविवार दिनांक 16 ऑगस्ट, सकाळी 9:45 वा.
अशी तपासणी शिबिरांची व्यवस्था मालेगाव शहरातील विविध भागात घेण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि आपले शहर आरोग्यमय करण्यास मदत करावी असे आवाहन ही मंत्री महोदय ना. श्री दादाजी भुसे व आयुक्त त्रंबक कासार यांनी केले आहे .
( दत्तात्रेय पी.काथेपूरी )
जनसंपर्क अधिकारी
मालेगाव महानगरपालिका मालेगाव.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق