धुळे शहरात होणार होणारा विजेचा लंपडाव थांबवा..
धुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा दया.
धुळे शहरात विविध ठिकाणी ५x२ MVA चे वीज उपकेंद्र उभारा.
जीर्ण पोल व लोंबकलेल्या तारा बदलून नवीन तारा टाका.
अश्या विविध मागण्या घेऊन आमदार फारूक शाह यांचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना साकडे..
(धुळे दि. २२ जून २०२१) धुळे शहर मतदार संघातील ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा देणे तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्याच अनुषंगाने विदयुत वितरण कंपनीची हानी कमी करण्यासाठी वीज वितरण व्यवस्था मजबूत होणे गरजेचे आहे. शहरात वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत असून वीज उपकेंद्र कमी असल्याकारणाने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे वीज वितरण अधिकारी व वीज ग्राहकांमध्ये वाद विवाद होत असतात. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरात वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यासाठी धुळे शहरात विविध ठिकाणी ५x२ MVA वीज उपकेंद्र होणे आवश्यक झाले आहे. नवीन वितरण रोहित्र बसविणे, वितरण रोहीत्रांची क्षमता वाढविणे, जीर्ण तारा व पोल बदलविणे, कंडक्टर बदलविणे ईत्यादींसारखी विविध कामे करण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करावी.
अशा आशयाचे निवेदन आज धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेत साकडे घातले. वरील काम पूर्णत्वास आल्यास त्याचा लाभ धुळेकर जनतेसह वीज वितरण कंपनीला देखील होणार आहे. धुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळेल आणि वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत होणार आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق