कर्म.या.ना.जाधव यांना राष्ट्र सेवा दला तर्फे अभिवादन

कर्म.या.ना.जाधव यांना राष्ट्र सेवा  दला तर्फे अभिवादन
मालेगाव- माजी खासदार, जेष्ठ सेवा दल सैनिक, महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्था संस्थापक कर्म.या.ना.जाधव यांना स्मृतिदिन निमित्ताने कर्म. या.ना.जाधव विद्यालय, मोसम पूल येथे राष्ट्र सेवा दला तर्फे अभिवादन करण्यात आले. 
 या प्रसंगी या.ना.जाधव यांचे नातजावई ऍड. गिरीष पवार यांचे हस्ते कर्म. या. ना. जाधव यांचे पुतळ्यास पुष्प हार करण्यात आला. सर्वानी समाधी स्थळाचे दर्शन घेतले. 
तसेच जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, राजीव सातव आणि कोरोना काळातील दिवंगत साथींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी सेवादल जिल्हा कार्यध्यक्ष विलास वडगे, जिल्हा संघटक रविराज सोनार, तालुका संघटक सारंग पाठक, पूर्णवेळ कार्यकर्ते नचिकेत कोळपकर, राजीव वडगे,  सहकार चळवळीचे प्रा. अनिल महाजन, संजय अहिरे, मनोज चव्हाण, प्रा.रमेश पवार, देविदास सूर्यवंशी, दीप पाठक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ليست هناك تعليقات: