आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यावर सायबर क्राईम दाखल करावा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब मागील काही दिवसांपूर्वी शारीरिक व्याधींनी आजारी होते त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
आदरणीय साहेबांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सुर बाहेर पडले. समाजातील असा कोणताही घटक नसेल,ज्यांनी साहेबांच्या उत्तम आरोग्य आणि दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केल्या.
परंतु हे काळजीचे जसे मेसेजेस येत होते, त्याच्या विरोधात अनेक विकृत मंडळी आदरणीय साहेबांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हिन दर्जाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर पोस्ट करत होती. काहींनी तर साहेबांच्या मरणाच्या आशा करत आपली विकृती समाजासमोर ठेवली.
या पोस्ट्स पाहून आदरणीय साहेबांना मानणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना खूप त्रास झाला.भाजपा आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा पार केली, गेली 50 वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमच्यासाठी आमचा मान, स्वाभिमान असणाऱ्या साहेबांच्यावर केलेली ही टीका अतिशय जिव्हारी लागणारी होती.
परिणामी मी आणि माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांना अद्दल घडविण्याचे ठरवले आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही मालेगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आदरणीय साहेबांच्या विरोधात विकृत लिखाण करणाऱ्या लोकांच्या विरोधात, कलम १५३ अ, ५०५(२), ५००,५०४,४६९,४९९,५०७,३५,
IT act 66(D) नुसार सायबर क्राईमला गुन्हे दाखल करण्यात यावे.अशी मागणी केली
राष्ट्रवादी पक्षाचे संस्कार शिस्तीचे आहेत आणि आम्ही कार्यकर्ते याच शिस्तीचे सतत पालन करत असतो, परंतु यापुढे आदरणीय साहेबांच्या बद्दल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
या प्रसंगी ब्रेक द चेन चे पालन करीत महानगर युवक अध्यक्ष दिनेश ठाकरे आणि अपंग सेल महानगर अध्यक्ष निलेश पाटील ,अनिल पाटील या मोजक्या पदाधिकाऱयांनी निवेदन दिले
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں