मालेगावात महिला दिनानिमित्त ती आणि फलाट या एक अंकी नाटकाचा प्रयोग सादर झाला. वारंवार महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यातून उदभवणार्या समस्या यावर ह्या नाटकाची थीम होती. या एक अंकी नाटकासाठी उपआयुक्त श्री. नितीन कापडणीस व मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. संजय पवार ही उपस्थित होते.
ती आणि फलाट क्रमांक या नाटकात एक मुलगी एका निर्जन बस स्थानकावर एकटी असल्याने तिच्यावर काय प्रसंग येतो व ती त्याला कस सामोरे जाते यावर ह्या नाटकाचं कथानक फिरत. स्त्री म्हणून नेहमीच तिला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. "मुली तुम्हाला फक्त उपभोगाच्या वस्तू आहेत ना! तुझ्यासारख्या लांडग्यांमुळे कुठलीच मुलगी सुरक्षित नाही. अशा एक ना अनेक दर्जेदार संवादाने नाटक वळण घेत नाटक शेवटी सर्व लोकांच्या डोळ्यात अंजन घालून पाणी आणत. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मालेगावचे तरुण नाट्यकर्मी जयराम माळी यांनी केले होते. या नाटकाचे निर्माते रवींद्र अलई व सहनिर्माते नीरज देवरे होते. नाटकात अग्निशमन विभागाचे कर्मचारी श्री. जीवन महिरे यांनी महत्वाची भूमिका केली. त्या सोबत इंद्रायणी गांगुर्डे, जयेश सोनवणे, पवन शिंदे, अनिकेत अहिरे, प्रणय पवळे व रविंद वाघ आदी उमदे कलावंत होते. नाटकाचं संगीत योगेश बागुल यांनी केले होते तर प्रकाश योजना रविंद वाघ यांनी केली. नाटकात किरण जाधव व जयश्री महिरे यांनी सह-दिगदर्शनाचे काम बघितले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق