मुळात या कायद्यासंबधी शेती तज्ञ,शेतकरी नेते,शेतकरी,विरोधी पक्ष यांना विश्वासात न घेता हा कायदा अत्यंत घाईघाईने लागू करण्यात आला आहे.
केंद्राच्या जुलमी कृषी कायद्याविरोधात भारतातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे
आणि म्हणून मागील दोन महिन्यापासून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतकरी ह्या कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत,देशाच्या विविध राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना दिल्ली च्या सीमेवर अडविण्यात आले,त्यांच्यावर अश्रुधूराचा वापर, कडाक्याच्या थंडीत पाण्याचा वापर,लाठीमार आदी प्रयोग करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.या निषेधार्त भारतातील शेतकरी संघटनांनी आज भारत बंद ची हाक दिली आहे त्याला सहर्ष पाठिंबा साई एकता हॉकर्स युनियन ने दिला आहे ,त्या मुळे शहरातील फेरीवाल्यांनी आज बंद मध्ये सहभाग नोंदविला आणि मा. अप्पर जिल्हाधिकारी,मालेगाव यांना निवेदन दिले आणि शेतकरी विरोधी कृषी कायदे केंद्र शासनाने मागे घ्यावे असे पत्र मा. पंतप्रधान यांना दिले. या प्रसंगी अध्यक्ष सुधाकर जोशी,सरचिटणीस दिनेश ठाकरे,राजेंद्र पाटील,असिफ तांबोळी,राजेंद्र घोडके,शाम करपे,योगेश जाधव,मनोहर सोंगरा,दिलीप गोरे,लता गायकवाड,कुणाल कदम,सैकू रहमान आदी उपस्थित होते.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں