मालेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस ने वन बूथ टेन युथ हि संकल्पना राबवून आगामी महापालिका निवडणूकीला सामोरे जाण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस आणि मालेगाव महानगर राष्ट्रवादी युवक चे पक्ष निरीक्षक श्री इरफान शेख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत केले.
या प्रसंगी श्री शेख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कामाकाजाचा आढावा घेतला आणि युवक काँग्रेसचे शहर (जिल्हा) अध्यक्ष दिनेश ठाकरे यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून आगामी कामाकाजाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या.तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रिक्त असलेल्या जागेवर अध्यक्षांची निवड लवकरच होईल असे सांगितले.
शेख यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या कार्याचा त्यांनी घेतलेल्या प्रशासकीय निर्णयांचा या वेळी उल्लेख केला अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्यासाठी निधीची कमतरता पडता कामा नये या साठी अल्पसंख्याक मंत्र्याला खर्चाचे पूर्ण अधिकार देण्याचे धोरण शरद पवार साहेबांनी सर्वप्रथम घेतले,मंडल आयोगाच्या निर्णयांची आंमलबाजावणी करून इथल्या मागास,शोषितांना न्याय देण्याचे काम पवार साहेबांच्या नेतृत्वात झाले अशीही आठवण श्री शेख यांनी या प्रसंगी करून दिली.
या प्रसंगी उपस्थित राजेंद्र भोसले यांनी युवकांना पक्षाची ध्येय धोरणे घराघरात पोचविण्यासाठी अखंड परिश्रम घेण्याचे आवाहन केले त्याच बरोबर भारतीय लोकशाही आणि भारताच्या संविधान बचावासाठी या पुढील काळात सजग राहण्याचे आवाहन केले .
युसुफ एलियास,असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष जाबिर शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या रिक्त असलेल्या मालेगाव शहर अध्यक्षांची निवड लवकरात लवकर करावी जेणेकरून पुढील कामकाज करणे सोईचे होईल असे सांगितले.
या प्रसंगी युवक शहर (जिल्हा) अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी आपल्या कार्याचा अहवाल निरीक्षक श्री शेख यांच्याकडे सोपवला आणि आगामी महापालिका निवडणूकी मध्ये युवकांना जास्तीत जास्त संधी दयावी अशी मागणी केली.
या बैठकीसाठी तालुका अध्यक्ष संदिप पवार, जेष्ठ नेते राजेंद्र भोसले,माजी उप-महापौर नरेंद्र सोनवणे,पॉवर लुम अकॅशन कमिटीचे अध्यक्ष युसूफ एलियास,नगरसेवक नंदू सावंत,विनोद चव्हाण,माजी नगरसेवक अनंत भोसले,युवक तालुका अध्यक्ष अरुण आहिरे,जाबिर शहा,किशोर इंगळे,डॉक्टर सेलचे डॉ.हितेंद्र चव्हाण,अपंग सेलचे निलेश पाटील,शाबान तांबोळी,शहजाद शेख,ज्ञानेश सोनवणे,रामदास बच्छाव,भगवान माळी,प्रशांत पाटील,योगेश भावसार,अनिल पाटील,डॉ अर्षद एलियास,सतीश जाधव,शंकर पंजाबी आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शंकर नागपुरे आणि आभार श्री प्रशांत महाजन यांनी मांडले.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں