म .स.गा महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रविण पाटिल यांचे पुस्तक प्रकाशित


 

म. स.गा महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ . प्रविण पाटिल यांचे बडगाव जिल्ह्यातील रोपांच्या मूलभूत औषधी गुणधर्मावर आधारित असलेले पुस्तक लॅम्बर्ट ह्या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेतर्फे पुस्तक प्रकाशित झाले . सदर पुस्तकाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि .एफ. शिरुडे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला .
वनस्पतिशास्त्रात मूलभूत संशोधन करण्यात आवड असलेले डॉ. पी . एस . पाटील यांनी आपल्या रोप संशोधनासाठी बडगाव जिल्ह्यातील संपूर्ण परिसरातील निसर्गाचा अभ्यास करून, अनेकानेक जाणत्या लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन anek वर्षाच्या मेहनतीतून प्लाण्टलोर इन बडगाव डिस्ट्रिक्ट हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी आणि ह्या  क्षेत्रात संशोधन करू  इच्छिणाऱ्या नवसंशोधकांना लाभ व्हावा ह्या हेतूने सदर पुस्तक उपलब्ध करून दिले. 
त्यांच्या ह्या यशाबद्दल संस्थेचे सचिव माननीय माजी राज्यमंत्री समाजश्री प्रशांतदादा हिरे , संस्थेचे समन्वयक अपूर्वभाऊ हिरे, संस्थेचे विश्वस्त माननीय अद्वय आबा हिरे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि . एफ. शिरुडे, उपप्राचार्य डॉ. सी . एम. निकम, पर्यवेक्षक डॉ. के.एस.अहिरे व इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
डॉ. राज त्रिभुवन यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ह्याप्रसंगी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. एम. एस.भंडारी , डॉ. वाय.डी . सोनावणे, प्राध्यापक अतुल पाटील, प्राध्यापक दिपक अहिरे उपस्थित होते.

کوئی تبصرے نہیں: