भारतीय जनता पार्टी व्यापार आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी मालेगाव येथील नितीन पोफळे यांच तर सह प्रमुखपदी धुळे येथील संजय अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील प्रभारी तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रसाद लाड संघटन सरचिटणीस श्री विजय राव पुराणिक, सरचिटणीस सुजितसिंग ठाकुर,व्यापार आघाडीचे प्रदेश संयोजक विनोदजी काकाणी यांनी व्यापार आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्यांची नुकतीच मुंबई येथे घोषणा केली त्यात पोफळे व अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री पोफळे जुने भाजपचे कार्यकर्ते,माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य असून त्यांनी मालेगाव जिल्हाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले आहे, क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, मालेगाव एज्युकेशन सोसायटी किल्ला यासह अनेक सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, संस्थांमध्ये कार्यरत आहेत श्री पोफळे यांनी लोकसभा विधानसभा नगरपालिका अन्य निवडणूक काळात विविध जबाबदाऱ्या प्रामुख्याने पेललेल्या आहे जनलोकपाल विधेयकासाठी झालेल्या प्रदीर्घ आंदोलनाचे नेतृत्वही त्यांनी केलेले आहे मालेगाव येथील  व्यापारी,उद्योजक, कारखानदार यांच्या विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर व्यापार आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.सहप्रमुख श्री संजय अग्रवाल हे महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष असुन दोंडाईचा धुळे येथील प्रतिष्ठित जुने व्यापारी आहेत. प्रदेश कार्यकारणी मध्ये नाशिक येथील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक  नाशिक भाजपा व्यापार प्रकोष्ठ माजी अध्‍यक्ष श्री सुनील वाघ यांची नियुक्ती करण्यात आली असून आत्मनिर्भर  भारत या योजनेचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे .
त्यांना नासिक,नगर,धुळे नंदुरबार,जळगाव, जिल्ह्यातील व्यापार संघटन वाढवणे तसेच त्याच्या समस्या बाबत पाठपुरावा करणे असे कामकाज असेल 
त्यांचा या नियुक्ती बद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर,माजीमंत्री आ. गिरीशमहाजन , माजी मंत्री आ.जयकुमारजी रावल,प्रदेश सरचिटणीस आ. देवयानीताई फरांदे,प्रदेश प्रवक्ता उपाध्यक्ष खा. भारतीताई पवार,आ. राहुल दादाआहेर,आ. सीमाताई हिरे,आ. ढिकले,आ.दिलीप बोरसे,नासिक चे महापौर श्री सतीशनाना कुलकर्णी, संघटनमंत्री किशोरजी काळकर, प्रभारी डॉ शशिकांत वाणी, भाजपगटनेते माजी जिल्हा अध्यक्ष श्री सुनीलआबा गायकवाड
महानगर अध्यक्ष मदन बापु गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे

ليست هناك تعليقات: