मालेगाव महानगरपालिकेकडून श्री गणेश विसर्जनासाठी सुरेख व उत्तम व्यवस्थापन: यशस्वी अँक्शन प्लॅन.


1. शहरात विविध ठिकाणी केलेल्या 13 कुंडांपैकी नऊ कृत्रिम कुंडाचे व 4 पारंपरिक कुंडाची व्यवस्था.
  2. प्रत्येक कुंडावर तज्ञ डॉक्टरांसह ॲम्बुलन्स व आरोग्य पथक.
  3. जीवरक्षक व अग्निशमन दलाचे जवान तैनात.
  4. मदतनीस व सफाई कर्मचारी
  5. सोडियम हायपो क्लोराइड ची फवारणी करणारे कर्मचारी.
  6. श्री.मूर्ती विसर्जन करण्यास मदत करणारे स्वतंत्र मनपा कर्मचारी पथक तैनात .
  7. ध्वनिक्षेपकावरून नागरिक, गणेश भक्त व गणेश मंडळ यांचे स्वागत करणारे व सूचना देणारे कर्मचारी.
  8. विद्युत व्यवस्था करणारे विद्युत विभागाचे कर्मचारी.
  9. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व कुंडांसाठी पाणीपुरवठा व्यवस्था करणारे पाणीपुरवठा कर्मचारी.
  10. कृत्रिम विसर्जनानंतर मूर्ती संकलन करून स्वतंत्र वाहनांद्वारे मनपाच्या पारंपारिक विसर्जन कुंडावर घेऊन जाणारे कर्मचारी पथक.
  11. प्रत्येक कुंडावरील नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकारी, लिपिक व इतर कर्मचाऱ्यांचे पथक.
  12. सर्व कुंडावर गस्ती घालण्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांचे स्वतंत्र पथक.
  13. सर्व विसर्जन कुंडावर वरिष्ठ स्तरावर सहाय्यक आयुक्त राहुल मर्ढेकर, तुषार आहेर, वैभव लोंढे, नगररचनाकार श्री संजय जाधव यांचे प्रत्यक्ष भेटी सह नियंत्रण व पाहणी.
  14. गणेश विसर्जनाच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी उपायुक्त विकास नितीन कापडणीस व उपायुक्त मुख्यालय रोहिदास दोरकुळकर यांचे आयुक्त त्रंबक कासार यांच्या आधिपत्याखाली विशेष नियोजन मनपाच्या सक्षम प्रशासनामुळे यशस्वी. 
जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह मॅडम यांनी कॅम्प गणेश कुंड येथे मनपाच्या उत्कृष्ट काम बद्दल समाधान व्यक्त केले

ليست هناك تعليقات: