भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्यात आल्यानंतर मागील कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारनी निवडीची प्रक्रिया सुरु आहे. नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वासर्वे प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर कुणाची निवड करतात याकड़े नाशिक पूर्वमधील सातही तालुक्यातील कार्यकर्त्यांची उत्सुकता लागून होती. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती व्हावी म्हणुन मालेगाव व इतर ठिकाणच्या वंचितमधील नेत्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ऍड. प्रकाश आंबेडकर यांना गळ घालण्यास सुरुवात केली होती,पण आता सर्वांच्या प्रतिक्षेला विराम मिळाला आहे.
ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नाशिक पूर्वचे कपिलभाऊ आहिरे यांची सर्वकश निकष लाऊन जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड केली आहे.
नाशिक पूर्वचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी कपिल आहिरे यांची नेमणूक पक्ष संघटन वाढीस उपयुक्त ठरेल असा विश्वास ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आहिरे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन विश्वास टाकला आहे.
पूर्ण जिल्ह्यातून एक तरुण तडफ़दार व्यक्तिमत्वाची निवड झाल्यामुळे सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमधे एक उत्साहाचे व आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
वंचितच्या जिल्हाध्यक्षांवर कळवण, देवळा, बागलाण, चांदवड, मालेगाव,नांदगांव, सुरगाणा ह्या तालुक्यांची जबाबदारी ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरानी सोपवली आहे.
उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे उपाध्यक्ष मंगेश केदारे,चांदवड,बाळासाहेब जाधव,देवळा,अविनाश केदारे,नांदगाव,जगदीश खरे,कळवण,जितेंद्र बच्छाव,सटाणा,महासचिव पदी संजय जगताप,तर सहसचिव पदी राम बस्ते,कळवण,प्रा.राजेंद्र पवार,मालेगाव, आनद दाणी,सटाणा,कोषाध्यक्ष शांताराम सोनवणे,मालेगाव, प्रवक्ता प्रा.विशाल खरे,जनसंपर्क मनोज अहिरे,मुकेश खैरनार,सदस्यपदी युवराज दाणी, राजू धिवरे,रवींद्र ढोढरे,योगेश निकम यांची निवड करण्यात आली.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق