नागरिकांनी लाभ घ्यावा- कृषी मंत्री श्री दादाजी भुसे , महापौर ताहेरा शेख व आयुक्त त्रंबक कासार यांचे शहरवासीयांना संयुक्तरीत्या आवाहन.
कृषी मंत्री महोदय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार शहरात कोरोणाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिका आयुक्तां त्र्यंबक कासार यांच्या आदेशाने उपायुक्त आरोग्याधिकारी यांच्या देखरेखीखाली शहरातील विविध भागात दिनांक 15 ऑगस्ट पासून नागरिकांची स्क्रीनिंग व आरोग्य तपासणी शिबिर महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटना द्वारे सुरू करण्यात आले आहे.
दि. 18 व 19 ऑगस्ट, रोजी कॅम्प परिसरात खालील दोन ठिकाणी तपासणी शिबिराचे आयोजन
1) दिनांक 18 ऑगस्ट 2020 हनुमान मंदिर, कैलास नगर, लिटिल एंजल्स स्कूल च्या बाजूला, अंगणवाडी क्रमांक 141 जवळ.
2) दिनांक 19 ऑगस्ट 2020 हनुमान मंदिर, पुष्पाताई हिरे नगर, स्वामी समर्थ केंद्राच्या मागे, मराठी शाळे जवळ.
मालेगाव महापालिकेमार्फत स्क्रिनिंग, आरोग्य तपासणी शिबिरामध्ये खालील सुविधा विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे.
1) गरजेनुसार एकूण 25 पेक्षा अधिक प्रकारच्या रक्ताच्या व इतर चाचण्या विनामुल्य करण्यात येत आहेत. 2) ऑक्सीजन सॅच्युरेशन (शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण), 3) ब्लड प्रेशर, (रक्तदाब) 4) शरीराचे तापमान ( बॉडी टेंपरेचर), 5) आवश्यक औषधे. याव्यतिरिक्तआवश्यक संशयित रुग्णांना घशाचा स्त्रावाचा नमुना - स्वॅब देण्यासाठी पुढील तपासणीसाठी संदर्भित केले जात आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि आपले शहर आरोग्यमय करण्यास मदत करावी असे आवाहन ही कृषी मंत्री महोदय ना.श्री दादाजी भुसे , मालेगाव महापालिकेच्या महापौर ताहेरा रशीद शेख व आयुक्त त्रंबक कासार यांनी केले आहे.
सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजीचे, सोयगाव नागरी आरोग्य केंद्राच्या बाजूला नवीन अग्निशमन केंद्र येथील तपासणी शिबीरात दुपार पर्यंत जवळपास 75 नागरिकांची तपासणी करण्यात आली तर त्यात तीन संशयित आढळून आलेत. उक्त प्रसंगी आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांनी प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी यांची प्रथम तपासणी करून सुरुवात केली, तर यावेळी नगरसेविका आशाताई प्रकाश आहिरे, आरोग्याधिकारी सपना ठाकरे प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, सोयगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री पवार, स्टाफ नर्स उज्वला देवरे, प्रज्ञा देवरे, बेबी सोनवणे, प्रथमेश कोटस्थाने, पुष्पा बैरागी, बालिका मते शितल पवार आशा कर्मचारी उपस्थित होते.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں