महापालिका व पोलिस प्रशासन यांच्यासह ताजिया कमिटीची महापौरांनी घेतली संयुक्त बैठक



 
 
कोविड साथरोग च्या सावटाखाली सण-उत्सव शासन निर्देशानुसार साजरे केले जात आहेत.
मोहरम-ताजिया व श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमी मालेगाव च्या महापौर ताहेरा रशीद शेख यांनी महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन ताजिया कमिटी यांची आपल्या दालनात आज शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी बैठक घेतली. 

कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रथम सहाय्यक आयुक्त वैभव लोंढे व तुषार आहेर यांनी शासनाचे निर्णय- परिपत्रक व मार्गदर्शक सूचना आणि निर्देश याबाबत सर्व उपस्थितांना माहितीसह सण उत्सवासाठी महापालिकेच्या तयारी बाबत सांगितले.

 *महापौर ताहेरा रशीद शेख यांचे निर्देश व भूमिका* 

महापौर ताहेरा शेख यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना सूचना केली की दोन्ही सण- उत्सवाच्या कामकाजात नागरिकांची कोणतीही तक्रार यायला नको याची दक्षता घेऊन सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारीने आपापले काम करावे, स्वच्छता, बांधकाम, पाणीपुरवठा , रस्ता दुरुस्ती, विद्युत मनपाच्या इतर सेवा इत्यादींनी दोन्ही सणासाठी उत्तम व्यवस्था ठेवावी. तर ताजिया कमिटी प्रमुख व सदस्यांनी तसेच श्री गणेश मंडळांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशाचे तंतोतंत पालन करून महापालिका व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. माजी आमदार- महापौर तथा नगरसेवक रशीद शेख यांनी ताजिया च्या वेळी बंद बाटलीतून पाणी व सरबत वाटप करावे असे आवाहन केले तर महापालिकेने स्वच्छता व इतर नागरी सेवांची जबाबदारी पूर्वक कामे करावीत. महापालिकेमार्फत आयुक्तांच्या आदेशाने 13 नियोजित स्थळांच्या श्री गणेश विसर्जनासाठी एकूण 248 जबाबदार वरिष्ठ नियंत्रण अधिकारी व कर्मचाऱ्यांची करावयाच्या कामासह सर्व स्तरावर नेमणूक केली आहे. त्यावर आयुक्त कासार व उपायुक्त कापडणीस जातीने लक्ष ठेवून आहेत.

 *शफिक राणा ताजिया कमिटी प्रमुख:* 

मालेगाव महापालिका प्रशासनाने बकरी ईद मध्ये  खूप चांगले काम केले. पोलीस प्रशासनाने चांगली भूमिका निभावली. मोहरम ताजिया अशावेळी आम्ही जास्तीत जास्त शासन निर्देशांचे पालन करून मनपा व पोलीस प्रशासनास सहकार्य करू. आम्ही ढोल,ताशे, लाउडस्पीकर लावणार नाहीत. ताजिया व मोहरम वेळी सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करू. मागील वर्षी एकूण 472 तजिया- ताबूत निघाले होते. त्यात यावर्षी आम्ही घट केली असून सुमारे 250 च्या आसपासच ताजिया असतील, त्यातही त्यांचे आकारमान व उंची कमीत कमी ठेवण्यात येतील. सर्व प्रशासनाने शक्य तेवढे आम्हास सहकार्य करावे. स्वच्छता व इतर व्यवस्थासाठी ताजिया स्थळांची यादी आम्ही प्रशासनास उपलब्ध करून देतो. प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन शहर ताजीया कमीटी बोलवून आमचे म्हणणे ऐकून घेतले, आमच्या समस्या समजावून घेऊन त्याचे निराकरण केले आणि संबंधितांना त्यांची जबाबदारी निश्चित करून दिली त्याबद्दल आम्ही सर्व ताजीया कमिटी तर्फे आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो असे शफीक राणा यांनी यावेळी सांगितले. 

 *श्री.संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक:* 

शहरातील नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करुन सायंकाळी 7 चे आतच घरगुती श्रींचे विसर्जन शक्यतो घरीच करून गर्दी टाळावी. मालेगाव महापालिकेने 13 ठिकाणी श्रींच्या विसर्जनासाठी  नियोजनासह 9 ठिकाणी कृत्रिम कुंडांची उत्तम व्यवस्था केली असून त्याची आज दुपारी आमच्या उपस्थितीत वाल्मीक नगर शाळेत रंगीत तालीम घेण्यात आली तर पोलीस प्रशासनाची ही तयारी पूर्ण झाली आहे. मोहरम - ताजिया साठीही नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे.

 यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, पोलीस उप अधीक्षक श्री मंगेश चव्हाण, श्री रत्नाकर नवले, तर महापालिका प्रशासनाकडून सहा. आयुक्त तुषार आहेर, सहा.आयुक्त वैभव लोंढे,अनिल पारखे,अतिक्रमण अधिक्षक राजू खैरनार, शहर अभियंता कैलास बच्छाव, पाणीपुरवठा अभियंता सचिन मालवाल,अग्निशमन अधिकारी संजय पवार,जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, शाम बुरकुल, स्विय सहायक सचिन महाले, उपअभियंता शांताराम चौरे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक उमेश सोनवणे तर ताजिया कमिटीचे प्रमुख शफिक राणा, सुन्नी ताजीया कमिटी चे जावेद अन्वर आणि दोन्ही कमिटीची सदस्यांमध्ये जावीद अहमद, कुर्बान अहमद, जावेद अख्तर, मोहम्मद इस्माईल, मोहम्मद अय्युब, रियाज अहमद कादरी, मोहम्मद रमजान  इत्यादी उपस्थित होते. 


کوئی تبصرے نہیں: