मालेगांव, मालेगांव ,मालेगाव, काय आहे नेमकं हे मालेगाव ? कस आहे हे मालेगाव ? कोणी म्हणतो मालेगाव पॅटर्न, कोणी म्हणतो मालेगाव संवेदनशील, कोणी म्हणतो मालेगाव यंत्र माग चे शहर , मालेगाव म्हणजे मॉलीवूड,दंगल, पोलियो रुग्ण, प्रदूषण ,मुशायरा, बॉम्ब स्फोट,कोरोना हॉटस्पॉट, कमी जागेत जास्त लोकसंख्या , राष्ट्रिय एकात्मता जोपासणारे ,सामाजिक सेवेत अग्रेसर असणारे मग ते कोरोना काळ असो की कुठलेहि संकट असो अश्या वेळी एकमेकासाठी मदत करणारे ,माणुसकिचि जान असणारे ,कोरोना काळात देखील बिनधास्त बिगर मास्क फिरणारे बेफिकिर मालेगावकर अश्या अनेक कारणांनी मालेगाव प्रसिद्ध आहे. अनेक अधिकारी येथे येताना विचारात पडतात पण जातांना मात्र येथील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाची शिदोरि न विसरता नेतात ,काय आहे मालेगावची नेमकी ओळख ?
एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या मालेगावात एकही ट्राफिक सिग्नल नाही कुठेही ही वनवे ट्रॅफिक नाही फूटपाथ नाही तरीही येथील नागरिक आपापला प्रवास एकमेकांना समजून सहज वर्षानुवर्षे पार करत आले त्याचं प्रमाणे जीवनातील ही प्रवास कुठल्याही *लाल हिरव्या* सिग्नल ला न अडकता पार पाडत असतांना दिसत आहे ही येथील विशेषता आहे
एक मात्र खरं की मालेगाव च्या कुंडलीत *प्र* आहे आणि तो *प्र* *प्रसिद्धीचा* असून *प्रगतीचा* कधी होणार ? हाच आता खरा प्रश्न आहे.
मालेगाव शहरात दोन ते तीन लाखाच्या घरात पावरलूम आहे व हा येथील मुख्य व्यवसाय असून इथे अनेक परप्रांतीय नागरिक व्यवसायानिमित्ताने कायमस्वरूपी मालेगावकर झालेत. या व्यवसायाला लागणारे विविध रॉ मटेरियल विविध पंथाचे लोक पुरवतात ,पावर लूम वर कापड तयार करणारे बहुतांशी मुस्लिम धर्मीय आहेत व परत ते तयार झालेले कापड, लुंगी ,साडी विकणारे इतर धर्मीय आहेत म्हणजे कापड विणतांना जसा ताना-बाना ची वीण जोडून कापड तयार होते त्याचप्रमाणे येथील सर्वधर्मीय व्यावसायिक ताना- बाना रूपाने एकमेकाला मदत करून एक रुपाने राष्ट्रीय एकात्मता जोपासतात ,याचाच अर्थ राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे हे खरे शहर आहे .साध्या कागदाच्या चिठ्ठीवर लाखोची उलाढाल विश्वासाने होते.
त्याचप्रमाणे या शहरात अनेक हरहुन्नरी कलाकार असून त्यांनी देशपातळीवर या शहराचे नाव लौकिक केले आहे. कुठलीही साधनसामुग्री ,सुविधा नसतानादेखील येथील कलाकारांनी आपल्या कष्टाने जिद्दीने स्व मेहनतीने मालेगावची *मॉलीवुड* ही आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीही साधन नसतांना मार्गदर्शन नसताना या क्षेत्रात एवढं नाव कमविणे हे सोप नाही येथील कलाकारांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी येथे नाट्यगृह देखील नाही ही एक खूप मोठी खंत आहे मालेगाव पेक्षा कमी लोकवस्ती असलेल्या शहरात नाट्यगृह किंवा इतर साधने उपलब्ध आहे परंतु मालेगावचे दुर्दैव ....म्हणूनच म्हणतो मालेगाव च्या कुंडलीत *प्र* आहे पण तो *प्र* प्रसिद्धीचा असून *प्र* प्रगतीचा कधी होणार ?
तसेच येथील लूम वर काम करणारे मुकादम, मजूर, उच्चशिक्षित नसतांना,कुठलेहि मार्गदर्शन नसताना देखील स्व जिद्दीने स्व मेहनतीने कष्टाने एखाद्या उच्चशिक्षित इंजिनीयरला लाजवतील अशा पद्धतीने जुन्या भंगार बाजारात जाऊन तेथील काही सामान (सुटे भाग) निवडून त्यातून कुठला भाग लुमवर कशा पद्धतीने वापरता येईल याचा योग्य विचार करून आणि त्या भागाचा अचूक उपयोग करून बिघडलेले लूम चालू करण्यात यशस्वी झाले आहेत , एवढेच नाही तर स्वताच्या कल्पकते द्वारे विविधता आणणे, साडीवर वेगवेगळ्या किनारी बनवणे, एखाद्या चांगल्या किनारीची हुबेहूब नक्कल करणे किंवा त्या हुन जास्त काय चागले करता येईल ते करुन सिद्धिस नेणे व नेतात हे कौशल्य त्यांच्यातून दिसून येते त्याचबरोबर अशिक्षित महिला देखील चरखा फिरवून या उद्योगाला साथ देतात हां हि भाग महत्वाचा आहे.
इतकेच नव्हे तर लूम मधील मजूर ,हॉटेलमध्ये काम करणारा कामगार ,कुठलेही ही सांस्कृतिक प्रशिक्षण ,आर्थिक पाठबळ, सुविधा, नाट्यप्रशिक्षण, नाट्यगृह स्टुडिओ रेकॉर्डिंग, डबिंग स्टुडिओ अश्या कुठल्याही सुविधा नसताना देखील उत्कृष्ट चित्रपट तयार करतो, इतकेच नव्हे तर स्वतः स्टोरी लिहितो डायरेक्शन करतो भूमिका करतो कॅमेरामन बनतो वेळ पडली तर स्पॉट बॉय चे कामदेखील करतो हे सर्व त्याच्या जिद्दीचे मेहनतीचे प्रतीक आहे . मेहनतीला साधनसामुग्रीची मार्गदर्शनाची योग्य साथ मिळणे खूप महत्त्वाचे आहे . अशावेळी अशा कलाकारांना जर योग्य सुविधा मिळाल्या तर खऱ्या अर्थान या सुप्त कलागुणां ची *प्रसिद्धी बरोबर प्रगती होईल* म्हणूनच म्हणतो मालेगाव च्या कुंडली तला *प्र* प्रसिद्धीचा आहे तो *प्र* प्रगतीचा कधी होणार ??
तसेच या शहरात काय प्रसिद्ध नाही ? अहो या शहरातील मास्टरटेलर,संगम बर्फ गोळा, दिलकश मेहंदी कोन,जुना फर्निचर बाजार, जुना भंगार बाजार, नऊ वार साडी, लुंगी, विविध कापड, आंबावडी, खारी बिस्कीट टोस्ट, अरविंद कुल्फी,रतनलाल लस्सी, सिरेमिक फ्रेम, लेडीज-जेन्टस किट, पर्स , अशा अनेक बाबी खूप प्रसिद्ध असून पर गावाहुंन त्यांची मागणी असते परगावातील व्यक्ती इथे हे खरेदीसाठी येत असतो इतकेच नव्हे तर आता तर कोरोनाच्या या काळात देखील मालेगांव विविध कारणासाठी प्रसिद्धीच्या झोतात राहिला ,येथील वाढत्या रुग्णां बरोबर येथील काढा देखील देशभर प्रसिद्ध झाला. या काढ्या ला देखील बाहेरगावाहून भरपूर मागणी होती व सर्वत्र चर्चा होती सांगायचा अर्थ एवढाच की मालेगाव सतत या न त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे परंतु आता मालेगावची प्रगती कधी होणार ? हाच खरा प्रश्न आहे.
हरिष मारु, मालेगांव
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں