भिवंडी महानगर पालिका के आयूकत पंकज आशिया की अपील

भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख दाटीवाटी गर्दीच्या चौकात बाजारपेठ एरियात भाजी मार्केट परिसरात फिरत्या तपासणी पथकाद्वारे antijen तपासणी सुरू करण्यात आली आहेत. Ambulance किंवा  मोबाईल व्हॅन यामध्ये वैद्यकीय पथक कार्यरत असून प्रभाग समिती निहाय गर्दीच्या परिसरात सदर तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवार  दिनांक सात ऑगस्ट रोजी या antijen तपासणी करण्यास  शहरात सुरुवात झालेली आहे. यापूर्वी  स्व.इंदिरा गांधी हॉस्पिटल, रईस हायस्कूल कोवीड केंद्र,  वराळ देवी मंगल  कार्यालय कोरोना केंद्र, टाटा आमंत्र, याठिकाणी  antijen टेस्ट करण्यात येत होत्या,  पण नागरिकांचा फारसा त्या ठिकाणी येऊन तपासणी करण्यास प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात घेऊन, प्रत्यक्ष बाजारपेठेत, भाजी मार्केट परिसर, दाट नागरि वस्तीमध्ये या कोरोना antijen टेस्ट करण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळपासून ओसवाल वाडी, नविवस्ती, शांती नगर भाजी मार्केट,  याच बरोबर प्रभाग समिती 3, प्रभाग समिती 4, प्रभाग समिती क्र.5 ऑफिस कार्यालय याठिकाणी कामगार कर्मचारी यांची देखील antijen तपासणी करण्यात आल्या. शुक्रवारी केलेल्या मोहिमेत एकूण 261 नागरिकांची antijen तपासण्या करण्यात आल्या यामध्ये 14 नागरिक  कोरोना बाधित positive आढळली असून, उर्वरित 247 लोकं यांना कोरोना लक्षण दिसून आली नाहीत.  प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आणि आपण तपासणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भिवंडी शहर कोरोना मुक्त होण्यास मदत होणार आहे. कोणालाही सतत येणारा खोकला,  ताप,  घशात खवखव असेल  या गोष्टीची लक्षणे लक्षात घेता ताबडतोब करून द्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, किंव्हा covid तपासणी केंद्रात जाऊन कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

ليست هناك تعليقات: