मालेगाव शहरातील मालेगाव कॅम्प, मोची कॉर्नर येथील शासकीय आय टी आय मधील प्रवेशा करिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. प्रवेश अर्ज भरण्याची पद्धत जिल्हास्तरीय असून आय टी आय मध्ये मुले प्रवेश घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना ट्रेड बद्दल काहीही माहिती नसते. प्रशिक्षण कालावधी, शिकवले जाणारे विषय ,परीक्षेचे स्वरूप आयटीआय पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगार, स्वयंरोजगार किंवा शिकाऊ उमेदवारी च्या संधी, नोकरी लागते का? असे अनेक प्रश्न /शंका पालकांना व मुलांना असतात .आयटीआय बद्दल संपूर्ण माहिती तसेच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बाबतची माहिती admission.gov.in या संकेत स्थळावर (वेबसाईट) उपलब्ध आहे तसेच अँड्रॉइड मोबाईल वर देखील ॲप माध्यमातून अर्ज भरण्यापासून ची संपूर्ण सुविधा MAHA ITI या ॲप वर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार सर्वसाधारण व आय एम सी कोटा अंतर्गत व्यवसाय निहाय जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मालेगाव येथील आयटीआय मध्ये वेल्डर ,प्लंबर कोपा ( संगणक ), ड्रेस मेकिंग ,वायरमन, इलेक्ट्रिशियन व फिटर या व्यवसायात अंतर्गत सर्वसाधारण व आय एम सी कोट्या अंतर्गत एकूण 236 जागा प्रवेशा करता उपलब्ध आहेत. यामध्ये 188 जागा सर्वसाधारण व 48 जागा आयएमसी कोट्याअंतर्गत भरण्यात येणार आहेत. आयएमसी कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागांकरिता वार्षिक शुल्क व इतर फि बाबत सविस्तर माहिती संस्थेत उपलब्ध असुन व्हाट्सअप सुविधेद्वारे घरपोच पुरवण्यात येणार आहेत याकरिता पालकांनी व विद्यार्थ्यांनी 98 22 13 50 22 किंवा 73 85 80 63 42 या क्रमांकावर " ITI " मेसेज सेंड केल्यास Auto reply माध्यमातून तात्काळ पुरवण्यात येणार आहे. " IMC FEE " टाईप करून सेंड केल्यास व्यवसाय निहाय संपूर्ण वार्षिक शुल्क बाबत माहिती पुरविण्यात येणार आहे. मालेगाव शहर व परिसरातील सर्व संबंधित पालकांना सर्व विद्यार्थ्यांना या सुविधेचा वापर करून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया अचुक व सोपी होणार आहे. 'ड्रेस मेकिंग' या फक्त मुली व महिलांसाठी असलेल्या ट्रेड करिता आयएमसी कोट्याअंतर्गत सर्वात कमी वार्षिक शुल्क रुपये 5000/- आकारण्यात येणार आहे. संस्थेत प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या सर्व व्यवसाय साठी सर्वसाधारण व आयएमसी कोटा अशा दोन्ही स्तरावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश भरतेवेळी स्वतः काळजीपूर्वक व अचुक माहिती भरणे आवश्यक आहे . ग्रामीण भागातुन दहावी परीक्षा उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण, एनसीसी, स्काऊट इत्यादी विषय घेतलेल्या, तंत्र विषय घेतलेल्या, इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण तसेच तालुका स्तर जिल्हास्तर इत्यादी स्तरावरील खेळात सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना "गुणाधिक्य" बहाल करण्यात येते याबाबत पालकांनी व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरती वेळी काळजी घेणे आवश्यक आहे.
covid-19 या महामारी संकटाला रोखण्यासाठी लॅपटॉप, संगणक वा मोबाईल या माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून द्यावी व अर्ज भरण्याची प्रक्रिया अचुकपणे पार पाडावी असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.बी. सूर्यवंशी यांनी केले आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق