लॉकडाऊनने जर कोरोना संपला असता तर आतापर्यंत
इतके लॉकडाऊन लागले तर कोरोना कधीच संपला असता, मागच्या वर्षी कोरोनाला पळविण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळीनाद केला होता, या थाळी नादाचा आणि कोरोनाचा कुठल्याच प्रकारचा ज्योतीषशास्त्रिय व वैज्ञानीक संबंध नव्हता. अशाच प्रकारे मागच्या वर्षी आणि या वर्षीही लोकांना लॉकडाऊनच्या नावाने मूर्ख बनवले जात आहे. या लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे दुकानदार, हातावर पोट असणारे अक्षरश: रस्त्यावर आले आहेत, घरातली चूल पेटत नाही आणि पेटणार नाही तर पोट भरणार नाही अशी अवस्था झाली आहे, तेव्हा या लॉकडाऊन विरोध म्हणून सगळ्या छोट्या-मोठ्या दुकानदारांनी, व्यावसायिकांनी एकत्र येऊन येत्या मंगळवारी दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी ठीक ३ वाजता थाळीनाद करायचा आहे.यात कुठलाही राजकीय पक्ष, धर्माचा काहीही संबंध नसून ही लढाई फक्त आपल्या पोटासाठीची आहे, तेव्हा जो जिथे आहे तेथूनच थाळीनाद, टाळी वाजवून या सरकारपर्यंत आपला लॉकडाऊनचा विरोधाचा निषेध नोंदवायचा आहे आणि या सरकारला झोपेतून उठवायचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने आपल्या पोटासाठी आपल्या आमच्या या लॉकडाऊन विरोधाच्या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हावे ही विनंती
आपले शानेहिनद निहाल अहेमद
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں