राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे कोव्हिडं-१९ च्या उपाय योजनांबाबत आणि HRCT चा दर कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आले

मालेगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे कोव्हिडं-१९ च्या उपाय योजनांबाबत आणि HRCT चा दर कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आले निवेदनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आणि HRCT करण्यासाठी चा दर कमी न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मागण्या–––––
मालेगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोव्हीड पेशंट ची संख्या दिवसागणिक वाढत आहे,मागील वर्षभर टाळेबंदी मुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक अडचणीत आला आहे त्यात कोव्हीड ची लक्षणे असल्यास खाजगी दवाखाने पेशंटला HRCT (High-resolution computed tomography) चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत,मालेगाव शहरात सदर चाचणी करणारी मोजकीच केंद्र आहेत आणि त्याचा दर प्रति व्यक्ती रु.२५००/- एवढा आहे आणि तीच चाचणी मालेगाव सिव्हील हॉस्पिटल मध्ये अवघ्या रु.५००/- दरात होते,आमची मागणी आहे कि खाजगी केंद्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल ह्या दरात चाचण्या कराव्यात त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेऊ शकतील परिणामी कोव्हीड पेशंट ची संख्या सुध्दा आटोक्यात येऊ शकते.

    तसेच कोव्हीड -१९ च्या उपाययोजनांबाबत आमच्या काही सूचना आहेत त्या आपण विचारात घ्याव्या.

१)      स्वब चा अहवाल येण्यास ३/४ दिवस लागतात परिणामी संभावित बाधित पेशंटचा अहवाल येईपर्यंत कोणतेही उपचार होत नाहीत त्यात त्याची प्रकृती ढासळते आणि तो इतरांना हि बाधित करतो.त्या मुळे स्वब चा अहवाल लवकर मिळावा. 

२)      शहरातील सहारा कोव्हीड सेंटर मध्ये पेशंटला रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध होत नसून त्यांना बाहेरुन आणाव लागत आहे.आणि सदर इंजेक्शन चढ्या भावाने मिळत आहे.

३)      महापलिका क्षेत्रातील रुग्णांसाठी CCC सेंटर चालू करणे.

४)      महापलिकेने वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांची भरती स्थगित केली आहे,सदर भरती तत्काळ करण्यात यावी.

५)      तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची DCH (Dedicated Covid Center) येथे नेमणूक व्हावी.

६)      Centralized Bed System(Jalgaon Pattern) चा प्रयोग करणे ज्या मुळे Occupied & Vaccant Venti Bed ची स्थिती समजण्यास मदत होते त्या मुळे पुढील उपाययोजना करण्यास मदत होते.

७)      तालुक्याचा विस्तार बघता PHC Level ला Swab Center Open करणे.

८)      PHC व ग्रामीण रुग्णालय येथे rapid antigen test चा पुरवठा करणे.

९)      ग्रामीण भागात आठवडे बाजारा च्या गावी CCC सेंटर चालू करणे.

 

या सर्व बाबींचा आपण गांभीर्याने विचार कराल आणि HRCT चे दर कमी करण्यासाठी आपण लक्ष घालाल अशी अपेक्षा व्यक्त करतो,अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ज्यादा दर घेणाऱ्या HRCT केंद्रासमोर आंदोलन करेल याची आपण नोंद घ्यावी.

या प्रसंगी युवक महानगर अध्यक्ष दिनेश ठाकरे,भगवान माळी,सागर पाटील,कुणाल कदम,राजेंद्र पाटील,शोएब  अहमद,नोमान मोहिद्दीन,अनिल पाटील,निलेश पाटील आदी उपस्थित होते

کوئی تبصرے نہیں: