फ्रंट लाईन कोविड योद्धा चषक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.


   
कृषिमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे आणि महापौर ताहेरा शेख, आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या हस्ते फ्रंट लाईन कोविड योद्धा  चषक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
मनपा: मालेगाव महानगरपालिका महासभा सभागृहात दि.२२ जानेवारी,२०२१ रोजी सायं.6 वाजता फ्रंट लाईन कोविड योद्धा  चषकाचे  पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम राज्याचे कृषि तथा माजी सैनिक कल्याण मंत्री ना. श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते, महापौर ताहेरा रशीद शेख यांच्या अध्यक्षेखाली आणि आयुक्त त्रंबक कासार आणि उपमहापौर निलेश दादा आहेर यांच्यासह इतर मान्यवरांच्या आणि मनपा चे सर्व अधिकारी,कर्मचारी ,सर्व टीम कप्तान, यांच्या उपस्थित उपस्थितीत संपन्न झाला. 
मालेगाव महानगरपालिकेने महापौर ताहेरा रशीद शेख यांच्या मार्गदर्शनाने, आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त विकास तथा इन्सिडेंट कमांडर नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेप्रमाणे शनिवार दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी फ्रंट लाईन कोविड योद्धा चषक नावाने भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. जगाच्या पाठीवर आलेला कोरोना संकटकाळात महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महसूल व पोलीस प्रशासन, पत्रकार आणि इतर सामाजिक घटक यांनी कोरोणास लढा देण्यासाठी खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. उपायुक्त कापडणीस यांच्या संकल्पनेनुसार कार्यालयीन कामकाज करीत असताना कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असावे, शारीरिक व मानसिक थकवा दूर व्हावा, तसेच कोरणा कालावधीत लढा देणार्‍या सर्व कोरणा योद्धा यांच्या सन्मानार्थ खेळांची स्पर्धा घेण्यात यावी यासाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तसेच महापालिकेशी निगडित इतर सामाजिक घटक जसे, नगरसेवक लोकप्रतिनिधी, पत्रकार संघ, महापालिकेचे ठेकेदार - मक्तेदार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, उर्दू मीडिया, महिला कर्मचारी संघ, महसुल प्रशासन असे,  प्रत्येकाचे संघ तयार करून स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उक्त स्पर्धेत विविध प्रकारच्या एकूण 54 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यात 2 महिला कर्मचारी यांचेही संघ होते. सहभागी प्रत्येक संघांना सहभागासाठी स्मृतिचिन्ह देण्यात आले, तर विजेता उपविजेता व तृतीय विजेता संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॉलर ,उत्कृष्ट खेळाडू, असली बहुमानही संबंधितांना देण्यात आले. 

महापौर ताहेरा रशीद शेख व आयुक्त त्रंबक कासार त्यांच्या सूचना व मार्गदर्शन अनुसार  उक्त सर्व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन उपायुक्त विकास नितीन कापडणीस , संगणक विभाग प्रमुख सचिन महाले आणि महापालिकेच्या इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केले. उक्त एक दिवसीय दिवसरात्र स्पर्धेत शेवटचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात उपायुक्त विकास यांच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तर गतवर्षाच्या वाडिया दवाखाना आरोग्य कर्मचारी संघाने उपविजेता म्हणून बहुमान मिळवला तर नगर रचना विभागाने तृतीय पारितोषिक पटकावले.  शिक्षण मंडळ संघाच्या कर्मचारी उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर नगररचना विभागाचे चंद्रकांत पाटील यांना उत्कृष्ट बॉलर म्हणून सन्मान दिला गेला. उक्त सर्व सन्मान व पारितोषिके मंत्री महोदय दादाजी भुसे महापौर ताहेरा शेख आयुक्त त्रंबक कासार उपमहापौर निलेश जी आहेर यांच्या हस्ते दिले गेले. 

यावेळी महापौर उपमहापौर यांनी अधिकारी-कर्मचारी याचबरोबर नागरिकांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी असे आयोजन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले तर महापालिकेमार्फत वर्षातून एकदा वयोगटात प्रमाणे महापौर मॅरेथॉन आयोजित करावी अशी सूचनाही मांडली. मंत्री महोदय यांच्या प्रयत्नातून शहरात भव्य क्रीडा संकुल उभे झाले आहे. मालेगाव तालुक्याच्या लाडक्या कृषिमंत्री महोदयांनी मालेगाव शहराच्या विकासात मोठा हातभार लावला असून त्यांनी मालेगाव शहरास नावलौकिक मिळवून दिले आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या अपेक्षा त्यांच्या कडून वाढल्या आहे.

 *कोरणा योद्ध्यांचा व मालेगाव चा मला सार्थ अभिमान :कृषि मंत्री ना. श्री दादाजी भुसे.* 

पारितोषिक वितरणप्रसंगी मंत्री महोदय श्री भुसे यांनी आपल्या खास शैलीत उपस्थित सर्वांचे प्रथम  कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.
तर माझ्या मते दरवर्षी मालेगाव महोत्सव सारखा कार्यक्रमास मोठे साप्ताहिक स्वरूप देऊन मालेगाव वासिया साठी व शहरातील वेगवेगळ्या कलावंतांना त्यांच्या कलगुणांना वाव मिळेल असे आयोजन करण्याची सूचना दिली, तसेच शहरात विविध ठिकाणी महापालिकेने बी ओ टी तसेच इतर तत्वांवर  क्रीडांगण तयार करावे, जेणे करून मालेगाव शहरात कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट, इत्यादी सर्व खेळाडूंना आपल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे ची संधी मिळेल.  या गोष्टी महापौर आणि आयुक्त यांनी मनावर घेतले तर होऊ शकतील. त्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करून मी निधी उपलब्ध करून देतो असेही यावेळी म्हणाले तसेच करोनाचे जगाच्या पाठीवर नवीन संकट आले त्यात सर्वांनी झपाटून काम केले, त्यामुळे मला तुमचा अभिमान वाटतो, लहान मोठे clinic मधील डॉक्टर यांनीही महत्वपूर्ण कामगिरी बजावली. ज्यावेळी कोरोणा संकट आले त्यावेळी एक वेळ अशी होती की मालेगाव ला सर्वजण नाव ठेवत होते. परंतु माझ्या बहाद्दर कोरोना योद्ध्यांनी आणि  मालेगाव वासीयांनी सर्वांत पुढे आदर्श निर्माण करून स्वतंत्र मालेगाव पॅटर्न विकसित केला ज्याची दखल संपूर्ण देशाने घेतली आणि मालेगाव ला कोरोन आटोक्यात आणून दाखवला आणि आपले मालेगाव सर्वांचे रोल मॉडेल ठरले. म्हणून मला माझ्या मालेगाव वासियांचा सार्थ अभिमान आहे. अजूनहि कोरोना संपलेला नाही.सर्व मालेगाव वासियानी  काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे प्रशासनास सहकार्य करावे, मास्क सह सामाजिक अंतराचे पालन करावे. 2021 हे वर्ष मालेगाव चे चित्र बदलणारे राहील. इतर बाबीचे नियोजन करून
छोटे छोटे प्रश्न सहज सुटू शकतात ,भुयारी गटार,मोसम नदी चे सुशोभीकरण प्रकल्पा चा मी पाठपुरावा करीत आहे, तसेच मोठे रुग्णालय सह, शहरात मोठ्या प्रकल्पाचेही शासन पातळीवर आणि केंद्र सरकारच्या स्तरावर प्रयत्न करत आहे असेही यावेळी मंत्री महोदय दादाजी भुसे यांन

کوئی تبصرے نہیں: