सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे, ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.या प्रमुख व इतर मागण्यांसाठी आज मालेगाव शहर महात्मा फुले समता परिषद यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहर व तालुका ओबीसी संघर्ष समिती च्या वतीने मोर्च्यांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना महामारी व शासनाने घालून दिलेल्या नियमांमुळे मोर्चा रद्द करून मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया बाहेर मोर्चे कऱ्यांनी निदर्शन आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांच्या वतीने समता परिषदेचे महानगर प्रमुख नरेंद्र सोनवणे व गुलाब पगारे यांच्या नेतृत्वाखाली अडव्होकेट अनिता पवार, विध्या भावसार, तृप्ती सोनवणे, सुवर्णा गवांदे, भाग्यश्री बेंडाळे, सिमा चव्हाण, संजीवनी कापडणीस आदींनी नायब तहसीलदार रवींद्र सायनकर यांना निवेदन दिले.
आंदोलनात माळी,फुलमाळी, साळी, सुतार तेली,न्हावी, शिंपी,भावसार, रंगारी, क्षत्रीय, तांबोळी, हिंदू-पेंढारी आदी सर्व ओबीसी समाजाच्या घटकातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
याप्रसंगी रमेश उचित, विनोद शेलार, बाळासाहेब बागुल, यशपाल बागुल, देवा माळी, सुरेश गवळी, रामदास बोरसे, चेतन महाजन,भगवान बागुल,आखाडे, विशाल सोनवणे, अडव्होकेट रमेश मोरे, व विवेक वारुळे, मनोज भालेराव, कमलेश सोनवणे आदी समाज बांधव सहभागी झाले होते.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں