गेल्या काही दिवसांमध्ये गिरणा जलाशयात काही समाज कंटकांकडून विषारी औषधाचा वापर करुन अवैधरीत्या मासे चोरी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. यामुळे लहान लहान मत्स्यबीज व मासे मृत होऊन ते पाण्यावर तरंगताना दिसले, ह्या कृत्या ची दाखल महानगरपालिका, पाटबंधारे व पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना घेतली. विषारी औषधाचा मास्यांवर व पाण्यावर परिणाम झाला का याची पडताळणी करण्यासाठी प्रयोग शाळांमध्ये सॅम्पल पाठवावे लागले.
पडताळणी झाल्यावर पाण्यातील जलचर सुस्थितीत वावरत असल्याचे दिसुन आल्यावर पम्पिंग सुरु करुन शहराचा पाणिपुरवठा सुरळीत करण्यात आला.
यासंदर्भात वर्तमान पत्रांच्या प्रतिनिधींनी मासेमारी ठेकेदार यांना स्पष्टिकरण विचारले असता अशी माहिती मिळाली की तीन वर्षपुर्वी ई-निविदाद्वारे मे. ब्रीज फिशरीज या कंपनीला मासेमारी ठेक्याचे कंत्राट मिळालेले असुन जलाशयातुन मत्स्योत्पादन वाढावे म्हणुन कंपनीने भारतीय प्रमुख कार्प (IMC) माश्यांचे मत्स्यबिज व झिंगा मोठया प्रामाणत संचयन केलेले आहे. तसेच मत्स्य व्यवसायासाठी पुर्वीपेक्षा पायाभुत सुविधांची निर्मिती केली आहे. यामुळे मत्स्यउत्पादन वाढत असुन यांच्या संरक्षणसाठी ठेकेदारांनी जलाशयाच्या परीसरात संरक्षक सुद्धा नेमलेले आहेत. यासाठी सदर कंपनीने कोट्यावधी रुपयांची गुंतवणुक केली आहे. मत्स्याउत्पादन वाढी बरोबरच स्थानिक लोकांना / मासेमारांना यातुन रोजगार मिळत आहे.
परंतु काहि समाजकंटकांची स्थानिक मासेमारी व मासेव्यापारी यांची भरभराट होऊ नये अशी ईच्छा आहे त्यामुळे ते काही अज्ञानी अज्ञात लोकांच्या सहाय्याने जलाशयात विषप्रयोग करुन मासेमारी करावयाचा प्रयत्न करतात. अशावेळी लहान मत्स्यबीजांचे / मास्यांची सुद्धा मरतुक होत असल्याने ठेकेदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याच बरोबर असे विषाचा अंश असलेले मासे आजुबाजुच्या शहरांत कमी किमतीत विकले जातात व याचा प्रादुर्भाव लोकांच्या आरोग्यावर होतो. सदर बाब प्रत्यक्षदर्शी पहाणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी याबाबत दु:ख व्यक्त केले तर ठेकेदाराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले.
आर्थिक नुकसान भरुन निघू शकते हा व्यवसायाचा भाग आहे परंतु मानवी आरोग्यास धोका मोठा प्रश्न आहे.
काही स्थानिक मासे व्यापारी अशा प्रकारच्या समाज कंटकांना/चोरांना मदत करण्यासाठी त्यांच्या प्रभावाचा फायदा घेतात आणि त्यांच्याकडून आर्थिक लाभ घेतात. असे स्थानिक व्यापारी शासनाकडुन नियमानुसार ठेका मिळालेल्या कंपनीचे सुध्दा नुकसान करीत आहेत. कंपनीने सांगितले की विषारी औषधाच्या घटना पुर्वीपासून येथे घडत असतात त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्यांची सुरक्षा यंत्रणा अपूरी आहे. कंपनीने विविध इसमांविरुध्द यापूर्वी पोलीस खात्यामध्ये तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे पोलिस व प्रशासनाने पाण्यात विषारी औषध टाकणाऱ्यांना कठोर कार्यवाही करणे गरजेचे आहे.
या संदर्भत पालकमंत्री श्री. दादा भूसे यांनी तात्काळ मालेगाव येथे बैठक घेतली आणि संबंधीत अधिकारी, कर्मचारी महानगरपालिकेचेआयुक्त, पाटबंधारे विभागाचे अभियंता व पोलिस यंत्रणा यांना संबंधीत कृत्यामागे जो कोणी असेल त्याचा शोध घेऊन अटक करुन कार्यवाही करण्यास सांगितले. पोलिस प्रशासन सुध्दा कार्यवाही करण्यात लागलेली आहे व संबंधीत व्यक्तींचा शोध घेत आहेत.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں