नाशिक ग्रामीण जिल्ह्यात गणेश चतुर्थी निमित्ताने गणेश विसर्जन शांततेत पार पडले

  . मालेगाव शहरात गणेश उत्सव निमित्ताने मालेगाव येथे मा.पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली  वेळोवेळी  शहरातील प्रतिष्ठित नागरिक,शांतता समिती सदस्य,गणेश मंडळाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी गणेश उत्सव निमत्ताने कॊनीही रस्याववर येणार नाही व  आपापल्या घरीच व महानगर पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावातच गणेश  विसर्जन करावे, तसेच शासनाने जारी केलेल्या नियमाप्रमाणे  गणेशोत्सव साजरा करण्यात यावा  व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे  सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे मालेगाव शहरातील नागरिकांनी व गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी देखील पोलीस  प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव निमित्ताने कॊनीही घराबाहेर न पडता घरीच राहून सण मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडला या बद्दल मा.पोलीस अधीक्षक  डॉ. आरती सिंह मॅडम, यांनी सर्व मालेगाव  शहरातील नागरिकांना गणेशोत्सव सणा निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचे धन्यवाद व्यवत केले आहे.तसेच  आगामी काळात  साजरे होणारे  सण उत्सवाचे 
कार्यक्रम घरीच साजरे करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.

کوئی تبصرے نہیں: