भिवंडी महानगरपालिका महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम

   आयुक्त डॉक्टर पंकज आशिया, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे सभागृह नेते विलास पाटील, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, नगरसेवक अरुण राऊत, सिध्देश्वर कामूर्ती,  उपायुक्त मुख्यालय डॉक्टर दीपक सावंत, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड,प्रभाग अधिकारी मारुती गायकवाड,प्रीतम पाटील,नूतन खाडे, प्रीती गाडे,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन मोकाशी,
, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले इत्यादी  उपस्थित होते. झेंडावंदन कार्यक्रम नंतर पालिकेतर्फे भिवंडी पोलिस विभागाला महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्याहस्ते  पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याकडे   150 ब्यारिकेटरस तर 30 नग ज्यामर भेट स्वरूपात देण्यात आले.यावेळी महापौर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व नागरिकांना भिवंडी शहर कोरोना मुक्त करण्याकरिता प्रयत्न करणारे महापालिका सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व कर्मचारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, पोलिस विभाग, गरीबांना अन्नदान करणाऱ्या सर्व सामाजिक संस्था, अन्य स्वरूपात  मदत स्वरूपात भेट देणाऱ्या संस्था यांचे आभार मानले. आपण लवकरच कोरोना मुक्त होऊ असा विश्वास महापौर प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केला. तरीही  मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे यावेळी प्रतिपादन केले.आयुक्त यांनी देखील सर्व नागरिक यांना शुभेच्छा दिल्या .

کوئی تبصرے نہیں: