वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर महापालिका आयुक्त त्रंबक कासार यांनी कोविड सेंटरांना दिली भेट

जनसंपर्क विभाग मनपा मालेगाव.
दि.13/8/2020

मालेगाव मनपा : मागील काही दिवसापासुन मालेगाव शहरात कोरोना बाधित नागरीकांची संख्या वाढलेली आहे.त्याअनुषंगाने महानगरपालिकेने यापुर्वीच सोशल डिस्टनसिंग व मास्क  वापरणे बाबत नागरीकांना आवाहन केले होते. त्या पार्श्वभुमीवर दि.12/8/2020 रोजी मनपा आयुक्त दिपक कासार यांनी मनपाने यापुर्वी तयार केलेल्या मन्सुरा, सहारा, के.बी.एच., मसगा महाविद्यालय येथील कोविड सेंटर येथे उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी सपना ठाकरे, आणि विविध विभागांचे प्रमुख यांच्या सोबत भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला. 
एप्रिल मे मध्ये मालेगाव च्या पुर्व भागात व आजसद्यस्थितीत पश्चिम भागात कोरोना बाधित नागरीकांची संख्या वाढत आहे. आजमितीस म.स.गा.कोविड सेंटर फुल झाले असुन सहारा कोविड सेंटर अर्धे भरले आहे. कोणत्याही क्षणी अधिकच्या क्षमतेची आवश्यकता भासु शकते. मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट असतांना नागरीकांच्या उपचार सुविधेसाठी पुर्व तयारी म्हणुन मालेगाव महापालिकेकडुन के.बी.एच.हायस्कुल येथेही सर्व सुविधा करण्यात आलेल्या होत्या परंतु मालेगाव शहरात कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे उक्त ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली नव्हती येथेही आयुक्त त्रंबक कासार यांनी उपायुक्त विकास व सर्व विभागप्रमुखांच्या चमुसह मन्सुरा, सहारा, केबीएच, मसगा या कोविड सेंटरर्सना भेट देऊन पाहणी व तपासणी केली. कोविड सेंटर मध्ये आवश्यक सोयी सुविधा याबाबत चाचपणी करुन सर्व संबधीतांशी चर्चा केली तसेच 1)आरोग्य, 2)स्वच्छता, 3)औषधे 4)गादया,पलंग 5)शौचालय 6)पाणी पुरवठा 7)विदयुत 8)जेवणाची व्यवस्था 9) सुरक्षा 10) वैद्यकीय व अन्य कर्मचारी व्यवस्था यासंह इतर सर्व आवश्यक सुविधांबाबत संबधीत विभागप्रमुखांना त्वरीत कार्यवाही करणेच्या सुचना केल्यात. मसगा महाविद्यालय येथील कोविड सेंटर येथील भेटीत रुग्णांशी हितगुज केली त्यात मनपाचे काही कर्मचारी वर्गाचाही समावेश होता. कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांच्याही अडीअडचणी समजुन घेऊन संबधीतांना त्वरीत कार्यवाही करणेस सांगितले. तर नागरीकांच्या सुविधेसाठी मसगा महाविद्यालय येथील कोविड सेंटर मध्येच गृह विलगीकरणातील कोरोना बाधित नागरीकांच्या औषधांची स्वतंत्र व्यवस्था करणेचे आदेश आरोग्य अधिकारींना दिले. 
  नागरीकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे, सार्वजनिक कार्यक्रम टाळावे, असे आयुक्तांनी आवाहन केले तर होम क्वारंटाईन मधील नागरीकांनी गृहविलगीकरणाचे सर्व नियम पाळावेत अन्यथा गुन्हा दाखल करुन त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल. तसेच खासगी डॉक्टर यांनी शासन नियमाप्रमाणे रुग्णालय खाटांमध्ये Covid  चे रुग्ण दाखल करावेत अन्यथा त्यांची नोंदणी रद्द करुन भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला जाईल. त्याचप्रमाणे खासगी लॅब ने रुग्णांची सर्व माहिती महापालिकेस त्वरीत सादर करावी अन्यथा त्यांची नोंदणी रद्द करुन पुढील कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्तांनी दिला.
  यावेळी मनपा आयुक्त, उपायुक्त विकास यांच्यासह, डॉ.हितेश महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहा.आयुक्त अनिल पारखे, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, उपअभियंता शांताराम चौरे, प्रभाग अभियंता मंगेश गवांदे जयपाल त्रिभुवन, डॉ.योगेश पाटिल, डॉ.स्वप्निल खैरणार, डॉ.जतीन कापडणीस, डॉ.मयुर शहा, डॉ.अबुल इरफान, डॉ.शहेजाद आमीर, डॉ.शहेबाज अन्सारी, डॉ. ऋषिकेश साळुंखे इत्यादी उपस्थित होते. 


                                                                                       ( दत्तात्रेय पी.काथेपूरी )             जनसंपर्क अधिकारी 
मालेगाव महानगरपालिका मालेगाव.

کوئی تبصرے نہیں: