मालेगाव, दि. 15 . अगस्त भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मालेगाव येथील नवीन तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गृहरक्षक दल व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा रशिद शेख, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, तहसिलदार चंद्रजित राजपूत, उप अभियंता राहुल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना ठाकरे, डॉ.शैलेश निकम, डॉ.हितेश महाले, डॉ.अब्दुल फैजी, डॉ.महेंद्र पाटील, स्वातंत्र्यसैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शासन निर्देशानुसार ध्वजारोहण कार्यक्रम मर्यादित स्वरूपात आणि आरोग्य विभागाच्या सूचना व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں